Wednesday, April 4, 2018

कुलसचिव वनामकृवि, परभणी यांचे निवेदन

विद्यापीठ प्रशासनाचे असे निदर्शनास आले आहे कीमागील आठवडयामध्ये विविध वर्तमान पत्रामध्ये डॉडीजीदळवी यांना सहयोगी प्राध्यापक (कृषि वनस्पतीशास्त्रपदावर पदोन्नतीबाबत अपु-या माहितीच्या अाधारे प्रसिध्द झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने विद्यापीठ प्रशासन खालील प्रमाणे स्पष्टीकरण सादर करीत आहे.
   डॉदत्तात्रय दळवीवनामकृविपरभणी अंतर्गत 1990 साली कृषि सहायक या पदावर रूजू झालेत्यांनी बीएस्सी (कृषिडॉपंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठअकोला येथुन व एमएस्सी (कृषिवनस्पतीशास्त्र या विषयातून वनामकृविपरभणी येथुन पूर्ण केली आहेतसेच त्यांनी सेवांतर्गत आचार्य पदवी सन 2005 मध्ये स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथुन कृषि वनस्पतीशास्त्र या विषयातून प्राप्त केली आहेतद्नंतर ते सन 2008 यावर्षी नामनिर्देशनाने सहायक प्राध्यापक (कृषि वनस्पतीशास्त्रया पदावर रूजू झाले.
   सन 2017 मध्ये श्रीडीजीदळवी यांना सहयोगी प्राध्यापक (कृषि वनस्पतीशास्त्रया पदावर विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्यात आलीसदर विभागीय पदोन्नती समितीसमोर श्रीमती गोदावरी पवार यांना सहयोगी प्राध्यापक (कृषि वनस्पतीशास्त्रपदासाठी आवश्यक अर्हतेनुसार सहायक प्राध्यापक (कृषि वनस्पतीशास्त्रया पदाचा 8 वर्षाचा अनुभव नसल्यामुळे विभागीय पदोन्नती समितीने त्यांची सहयोगी प्राध्यापक (कृषि वनस्पतीशास्त्रया पदासाठी शिफारस केली नाही.
   श्रीमती गोदावरी पवार, सहायक प्राध्यापक (कृषि वनस्पतीशास्त्रयांनी दिनांक 22.2.2018 रोजीच्या निवेदनाद्वारे श्रीदत्तात्रय दळवी, सहयोगी प्राध्यापक (कृषि वनस्पतीशास्त्रयांच्या आचार्य पदवीबाबत आक्षेप घेतला आहेतद्षंगाने विद्यापीठ प्रशासनाने स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड प्रशासनाकडे दि. 12.3.2018 रोजी डॉदत्तात्रय दळवी यांचे आचार्य पदवी प्रमाणपत्राचा खरेपणाची पडताळणी करुन कळविणे बाबत विनंती केली आहेत्यांचे उत्तर अद्याप अप्राप्त आहे.
  तसेच श्रीमती गोदावरी पवार यांनी माउच्च न्यायालय खंडपीठऔरंगाबाद येथे रिट याचिका क्रंमाक 4129/2017 नुसार त्यांना सहयोगी प्राध्यापक (कृषि वनस्पतीशास्त्रया पदावर पदोन्नतीसाठी पात्र करणे बाबत याचिका दाखल केली आहेतद्नंतर त्यांनी उपरोक्‍त याचिकेमध्ये श्री दत्तात्रय दळवी यांच्या अनुभवाबाबत व त्यांची आचार्य पदवी अकृषि विद्यापीठाची असलेबाबत दिवाणी अर्ज दाखल केला आहेयावरुन सदरील प्रकरण सद्यस्थितीत न्यायप्रविष्ट आहे.
   तरी सर्व वृत्तपत्र प्रतिनिधींना विनंती करण्यात येते की, आपण बातमी प्रसिध्द करणेपूर्वी विद्यापीठ प्रशासनाकडे खात्री करुन बातमी दिल्यास विद्यापीठाची होणारी नाहक बदनामी टळू शकेल उपरोक्त प्रमाणे वस्तूस्थिती आपले वर्तमानपत्रातुन प्रसिध्दीस देवून विद्यापीठ प्रशासनास सहकार्य करावे हि विनंती.

कुलसचिव, वनामकृविपरभणी