Sunday, February 11, 2018

वनामकृवितील एलपीपी स्‍कुलमध्‍ये कॉन्‍व्‍होकेशन व टॅलेंट शो साजरा

वनामकृविच्‍या सामाजिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व अभ्यास विभागातर्फे एलपीपी स्कूल मध्‍ये नववे कॉन्व्होकेशन व टॅलेंट शो जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. हेमांगिनी सरंबेकर, माजी प्राचार्य प्रा. विशाला पटनम, एलपीपी स्कूलचे माजी विद्यार्थीं व सध्‍या टोरन्टो (कॅनडा) येथे कार्यरत असणारे इंजिनीअर श्री अनिकेत पाटील, डॉ. जया बंगाळे, डॉ. वीणा भालेराव, डॉ. रमन्ना देसेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती. टॅलेंश शो मध्‍ये एलपीपी स्कुलच्‍या विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या विविध कलागुणांचे सादरिकरण केले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना मान्‍यवरांनी एलपीपी स्कूलमधील उच्च दर्जाच्या बालशिक्षणामुळे अनेक विद्या‍र्थ्‍यीं पुढे प्रौढावस्थेत उत्तूंग भरारी घेत असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमास विद्यार्थ्‍यांचे पालक, महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.