Friday, March 10, 2017

मृद आरोग्य पत्रिकांच्‍या वापराबाबत शेतक-यांना मार्गदर्शनाची गरज....मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. विलास पाटील

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग जिल्हा कृषि अधिकारी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मिनीचे रासायनिक गुणधर्म, दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी या‍ विषयावरील पाच दिवसीय प्रशिक्षणाचे दिनांक 6 ते 10 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप दिनांक 10 मार्च रोजी पार पाडला, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलसचिव डॉ विलास पाटील हे होते तर डॉ चेऊरकर, डॉ. व्ही. डी. तावडे, डॉ राकेश आहीरे आदींची प्रमुख उपस्थीती होती. अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ विलास पाटील म्हणाले की, सदरिल प्रशिक्षणात प्राप्‍त ज्ञानाव्‍दारे कृषि विभागातील माती परिक्षण प्रयोगशाळेतील विवि तंत्र अधिकारी यांना प्रयोगशाळेत जमिनीच्या गुणधर्म पृथ:करणातील येणाऱ्या अडचणी निश्चितच सोडविता येतील. मृद आरोग्‍य पत्रिकांच्‍या वापराबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करणे गरजेचे असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. कार्यक्रमात मान्यंवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रशिक्षनार्थींनी आपल्‍या मनोगतात प्रशिक्षणात प्राप्‍त ज्ञानाचा शेतक-यांना मार्गदर्शन करतांना होईल असे मत व्यक्त केले. प्रशिक्षणामरावाडयातील विवि मृदचाचणी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ सहभागी होते. प्रास्ताविक डॉ सुरेश वाईकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ पपीता गौरखेडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ स्वाती झाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॅा. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, प्रा. प्रभाकर अडसुळ, प्रा. सुनिल गलांडे, डॉ. सदाशिव अडकीणे, श्री अनिल मोरे आदींनी परिश्रम घेतले.