Tuesday, March 14, 2017

वसमत येथे हळद तज्ञ डॉ. जितेंद्रकुमार कदम यांचे दि. 17 मार्च रोजी मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व तालुका कृषि अधिकारी, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने हळद उत्पादक शेतक-यांकरिता शुक्रवार दि. 17 मार्च रोजी सकाळी 10.00 वाजता प्रसाद मंगल कार्यालय, परभणी रोड,  वसमत येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्‍यात कसबे डिग्रस (ता. मिरज जि. सांगली) येथील हळद संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी तथा प्रख्यात हळद तज्ञ डॉ. जितेंद्रकुमार कदम यांचे मार्गदर्शन होणार आहे. मेळाव्यासाठी शेतक-यांना मोफत प्रवेश राहणार असुन शेतक-यांनी सदर मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विस्तार कृषि विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक डॉ. यु. एन. आळसे व तालुका कृषि अधिकारी, वसमत श्री. गजानन पवार यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्र, वनामकृवि, परभणी (02452-229000), डॉ. यु. एन. आळसे (7588082137), प्रा. डी. डी. पटाईत (7588082040) किंवा डॉ. एस. जी. पुरी (7588635426) यांच्‍याशी संपर्क साधावा.