Monday, April 25, 2016

कुंभकर्ण टाकळी येथे शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालय व कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने टाकळी कुंभकर्ण येथे महिला शेतकरी सक्षमीकरण कार्यशाळाचे दिनांक 21 व 22 एप्रिल रोजी करण्‍यात आले होते. या दोन दिवसीय कार्यशाळेत महिला विकास व जबाबदा-या, मानसिक स्‍वास्‍थाची जपवणुक, बालविकास या विषयांवर मार्गदर्शन करण्‍यात आले. तसेच शेतकरी महिलांचे काबाडकष्‍ट कमी करण्‍याचे तंत्रज्ञान, उद्योजकता विकासाकरिता कपडयावरील बांधणीकाम, हस्‍तकलेच्‍या कलाकृती आदी विषयावरील कार्यानुभवातुन प्रशिक्षण देण्‍यात आले. यावेळी कार्यशाळेत उपयुक्‍त ज्ञान कौशल्‍य प्राप्‍त झाल्‍याची प्रतिक्रिया सहभागी महिलांनी व्‍यक्‍त केली. कार्यशाळेत गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटनम, डॉ जयश्री झेंड, प्रा निता गायकवाड, डॉ जया बंगाळे आदी साधनव्‍यक्‍तींनी मार्गदर्शन केले. कार्यशाळे यशस्‍वीतेसाठी प्राचार्या प्रा विशाला पटनम यांच्‍या मार्गदर्शनाखाली मनिषा क-हाळे, संध्‍या अदमनकर, मंजुषा रेवणवार, संगिता नाईक आदीं परिश्रम घेतले तर सरपंच विनायक सामाले, उपसरपंच श्‍यामाबाई कांचगुंडे आदीसह गावकरी मंडळीचे सहकार्य लाभले.