Tuesday, April 19, 2016

प्रगतशील शेतक-यांच्या शेतावर विद्यार्थ्यांनी गिरवीले आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे धडे

अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमांतर्गत मौजे जिंतुर तालुक्‍यातील केहाळ येथील कृषिभुषण श्री. मधुकरराव घुगे यांच्‍या शेतीला विद्यार्थ्‍यांची भेट
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या आठव्‍या सत्रातील कृषिविद्या विभागातील विद्यार्थ्‍यांची उन्‍हाळी भुईमुग बिजोत्‍पादन तंत्रज्ञान या अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमांतर्गत अभ्‍यासदौ-याच्‍या माध्‍यमातुन दिनांक ५ एप्रिल रोजी मौजे जिंतुर तालुक्‍यातील केहाळ येथील कृषिभुषण श्री. मधुकरराव घुगे यांच्‍या शेताला भेट दिली. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन भुईमु्गाचे विक्रमी उत्‍पादन श्री. मधुकरराव घुगे हे मागील सोळा वर्षापासुन घेत आहेत. सद्य दुष्‍काळ‍ परिस्थितीतही आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या अवलंब करून जमीनीची योग्‍य मशागत व तुषार सिंचनाचा योग्‍य वापरच्‍या आधारे भुईमुगाची उगवण व वाढ एकसारखी दिसुन आली, २२ एकरावर टॅग ५७ व  टॅग ४१ भुईमुगाच्‍या जाती घेतलेल्‍या असुन ब-यापैकी उत्‍पादन अपेक्षीत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमांतर्गत सदरिल विद्यार्थ्‍यांनी देखिल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषिविद्या विभागामध्‍ये भुईमुगाचे बिजोत्‍पादन घेतले आहे, त्‍या इक्रीसॅट पध्‍दतीने रुंद सरी वरंबा पध्‍दत, सरी वरंबा पध्‍दत व सर्वसाधारण शेतकरी अवलंबीत असलेल्‍या सारा पध्‍दत या तीन्‍ही प्रकारे अभ्‍यास करण्‍यात येत आहे. या अभ्‍यासक्रमाचा भाग म्‍हणुन अभ्‍यासदौ-याचे आयोजन प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, डॉ. पी. के. वाघमारे, डॉ. जयश्री एकाळेडॉ. प्रविण कापसे यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले होते.