Friday, December 4, 2015

वनामकृवीचे पिक पोषक अन्नद्रव्ये बाबत अॅप विकसीत

जागतिक मृदा दिनानिमित्त ५ डिसेंबर पासून मोबाईल अॅप उपलब्ध

स्‍मार्टफोन एन्ड्रोईड मोबाईल वापर शेतकरी ही मोठया प्रमाणावर करील असुन आधुनिक शेती तंत्रज्ञान इंटरनेट माध्यमातून माहिती घेत आहेत. संतुलित पिक पोषणाबाबत पूर्ण शेतकरीवर्ग अद्यापपर्यंत पूर्णपणे जागरूक झालेला नाहीत. त्‍या पार्श्‍वभुमीवर पिक पोषणाबाबत शेतक-यांना शास्त्रीय माहिती सोप्या मराठी भाषेत उपलब्ध होण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरुलु यांच्या मार्गदर्शनाखाली मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास पाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ सय्यद इस्माईल आणि डॉ. हरिहर कौसडीकर यांनी पिक पोषण (प्‍लँट न्‍युट्रिशन व्‍हीएनएमकेवी) या नावाने एन्ड्रोईड मोबाईल अॅपची निर्मीती केली आहे. याव्‍दारे पिकातील आवश्यक अन्नद्रव्ये कमतरतेची ओळख आणि उपाय, जमिनीचे गुणधर्म याबाबत सविस्तर व सखोल माहिती उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. हि मोबाईल अप्‍स मोफत व इंटरनेट शिवाय ही वापरता येईल, केवळ एक वेळेस डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेटची गरज भासते. डाऊनलोड करण्यासाठी गूगल प्ले स्टोअर जाऊन इंग्रजी मध्ये plant nutrition-vnmkv असे टाईप करावे. पिक पोषणासाठी आवश्यक नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मगनेशियम, गंधक, लोह , मंगल, तांबे, जस्त, बोरॉन, मोलाब्द यांची पिकातील कार्ये, कमतरतेची लक्षणे शब्दात आणि छायाचित्राच्‍या स्वरुपात, त्यावरील उपाययोजना, विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांचा जमिनीतून व फवारणीतून वापर याबद्दल ची माहिती देण्यात आली आहे. कृषी विस्तार कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी आणि कृषी संबंधित सर्वांसाठी वनामकृवी विकसीत पिक पोषण या मोबाईल अॅपचा उपयोग होईल. हि मोबाईल अॅप सर्वांसाठी जागतिक मृदा दिनानिमित्त ५ डिसेंबर पासून औपचारिकरित्या उपलब्ध होणार असुन शेतक-यांची मागणी व गरजेनुसार यात पुढेही सुधारणा करण्‍यात येणार असल्‍याचे विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांनी सांगितले आहे.