Saturday, October 3, 2015

स्वच्छतेबाबत सर्वांनी जागरूक राहावे........शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान  महाविद्यालयाच्‍या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनाक २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन हे होते तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उदय खोडके हे उपस्थित होते.
शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून उपस्थितांना स्‍वच्‍छतेची शपथ दिली.   मार्गदर्शनपर भाषणात शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन यांनी स्वच्छतेच्‍या बाबतीत सर्वांनी जागरूक राहून मुळातच अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्‍यावी, असा सल्‍ला दिला तर प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी माननीय पंतप्रधान यांनी राष्ट्र उभारणीकरिता हाती घेतलेली स्वच्छतेची मोहीम प्रत्येकाच्या सर्वांगीण विकासाकरिता पूरक असून त्याचे आपण पालन करावे, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.

या अभियानात प्रभाताफेरिन काढुन श्रमदान करण्‍यात आले. श्रमदानात विद्यार्थ्‍यासह महाविद्यालयातील प्रा. भास्कर भुईभार, प्रा. विवेकांनंद भोसले, प्रा. डॉ. स्मिता खोडके, प्रा. हरीश आवरी, प्रा. सुमंत जाधव, प्रा. मधुकर मोरे, प्रा. पंडित मुंढे, प्रा. गोपाल शिंदे, प्रा. प्रमोदिनी मोरे, लक्ष्मीकांत राऊतमारे, अमृत उबाळे, के. बी. फाजगे, अनिल पांचाळ, एम. जे. डोंबे, डब्ल्यू. के. खराटे, गजानन रनेर आदींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कल्पना भोसले, प्रशांत अटकळ, अजय सातपुते, शरद गवळी, प्रसाद वारे, ज्ञानेश्वर मोरे, हनुमान बावणे, पूजा शेट्टे, वृषाली खाकाळ, आश्विनी पवार आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीताराम बच्चे याने तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा संजय पवार यांनी केले.