Friday, October 2, 2015

महात्‍मा गांधी जयंती निमित्‍त कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यानी राबविली परिसर स्‍वच्छता मोहिम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने महात्‍मा गांधी व लालबहादुर शास्‍त्री यांच्‍या जयंती निमित्‍त दि ऑक्‍टोबर रोजी विद्यापीठ परिसर स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात आली. यावेळी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते महात्‍मा गांधी व लालबहादुर शास्‍त्री यांच्‍या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्‍यात आले. कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांनी उपस्थितांना स्‍वच्‍छतेची शपथ दिली. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ डि एन गोखले व रासेयोचे कार्यक्रम समन्‍वयक डॉ महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी वर्षभरात कृषि महाविद्यालयच्‍या विद्यार्थ्‍यानी विविध मोहिमेत सहभाग घेऊन स्‍वच्‍छता मोहिम यशस्‍वीपणे राबविल्‍याचे सांगितले. विद्यापीठ परिसरात स्‍वच्‍छता रॅली काढण्‍यात येऊन राष्‍ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा ए एम कांबळे व प्रा विजय जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वयंसेवक तसेच राष्‍ट्रीय छात्र सेनचे छात्र सेना अधिकारी डॉ जयकुमार देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली छात्रसैनिक यांच्‍यासह पाचशे विद्यार्थ्‍यांनी स्‍वयंस्‍फुर्तीने विद्यापीठ परिसर स्‍वच्‍छता मोहिमेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्‍ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा ए एम कांबळे यांनी केले. कार्यक्रमास विभाग प्रमुख, महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.