Wednesday, July 15, 2015

पहिला जागतिक युवा कौशल्‍य दिन वनामकृवित उत्‍साहात साजरा

सन्‍माननीय पतंप्रधानाच्‍या भाषणाच्‍या थेट प्रक्षेपणाचा घेतला कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थीनी लाभ
कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुल‍सचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आदी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने दि १५ जुलै रोजी पहिला जागतिक युवा कौशल्‍य दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍‍थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, जगात भारत हा युवा राष्‍ट्र म्‍हणुन ओळखले जातो, देशाच्‍या एकुण लोकसंख्‍येत युवकांचे प्रमाण अधिक असुन त्‍यांच्‍यात उद्योजकता कौशल्‍य वाढीस कौशल्‍य विकास व उद्योजकताचे राष्‍ट्रीय धोरणाचा निश्चित लाभ होणार आहे, त्‍याचा लाभ कृषि पद्वीधरांनाही घ्‍यावा, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.
याप्रसंगी कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्‍या वतीने स्किल इंडिया मोहिमेस नवी दिल्‍ली येथील विज्ञान भवनात सन्‍माननीय पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते प्रारंभ करण्‍यात आला व कौशल्‍य विकास आणि उपक्रमशीलता २०१५ या राष्‍ट्रीय धोरणाची घोषणा सन्‍माननीय पंतप्रधान यांनी केली व देशातील युवकांना संबोधीत केले. या संपुर्ण कार्यक्रमाचे दुरदर्शनच्‍या माध्‍यमातुन थेट प्रक्षेपण कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात मोठया पडदयावर करण्‍यात आले, याचा लाभ विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थीनी घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन प्रा रणजित चव्‍हाण यांनी तर आभार प्रदर्शन प्रा एस एल बडगुजर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.