Tuesday, June 9, 2015

मोसंबीवरील डिंक्‍या रोग्‍याच्‍या व्‍यवस्‍‍थापनासाठी बोर्डोपेस्‍ट लावा......कृषि शास्‍त्रज्ञ डॉ.डी. डी निर्मल

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या लिंबुवर्गीय फळपिकांवर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियानातंर्गत नांदेड जिल्‍हातील मौजे ढोकी येथे दिनांक ६ जुन रोजी मोसंबी बागायतदारांचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्‍यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी गांवचे सरपंच बी जी डाखोरे हे होते तर अभियानाचे प्रभारी अधिकारी डॉ डी डी निर्मल, तालुका कृषि अधिकारी डी. आर. राजेवार, विषय विशेषज्ञ डॉ. देविकांत देशमुख, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन जी.एम.लबडे, कृषी पर्यवेक्षक जी. यु. लोखंडे, आत्‍माचे तालुका तंत्र व्‍यवस्‍थापन सी. डी. कदम, कृषी पर्यवेक्षक एस. एम. करंजकर, पर्यवेक्षक जी. पी. वाघोळे, एन. डी. कवठे आदीं उपस्थित होत. हे अभियान कुलगुरु मा डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या मार्गदर्शनाखाली व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या अधिनिस्‍त विद्यापीठाच्‍या वतीने मराठवाडयात राबविण्‍यात येत आहे. 
प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना वनस्‍पती विकृती शास्‍त्रज्ञ डॉ. डी. डी. निर्मल म्‍हणाले की, मोसंबी बागेचे डिंक्‍या, सिट्रस ग्रिनीग व सिट्रस ट्रिस्‍टीझा या  िंक्‍या ोरा   िक्षण रोगांमुळे  मोठया प्रमाणावर नुकसान होते, डिंक्‍या रोग हा फायटोप्‍थोरा बुरशीमुळे होतो, या रोगाच्‍या नियंत्रणासाठी मोसंबीच्‍या झाडांना दरवर्षी बोर्डोपेस्‍ट लावावी. तर शास्‍त्रज्ञ डॉ.एस.पी.चव्‍हाण आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, शेतक-यांनी रोगमुक्‍त निरोगी रोपांची लागवड करून मोसंबी बागेचे शास्‍त्रशुध्‍द व्‍यवस्‍थापन केल्‍यास अधिक उत्‍पादन मिळु शकते. शास्‍त्रज्ञ डॉ.पी.एम.सांगळे यांनी मोसंबीवरिल विविध किडांच्‍या व्‍यवस्‍थापनाचे उपाय सुचविले तसेच प्रा. यु. व्‍ही. सातपुते यांनी मोसंबी बागेसाठी जमिनीची निवड खत व्‍यवस्‍थापन याविषयी तर प्रा. यु. के. भोगिल यांनी मोसंबी बागेसाठी पाणी व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शेतकरी रमेश लबडे व वामनराव जाधव यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डी.डी. आगलावे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी गंगाधर ल‍बडे, सुदर्शन बोराडे, अमोल धाडगे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी नांदेड तालुक्‍यातील मोसंबी बागायतदार मोठया संख्‍येने उपस्थित होते.