Wednesday, June 10, 2015

वाई येथील आदिवासी शेतक-यांचे शेती उत्‍पादन वाढीसाठी विद्यापीठ विविध उपक्रम राबविणार.......कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृविच्‍या आदिवासी शेतकरी मेळावास मोठा प्रतिसाद
आदिवासी शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री रविंद्र पतंगे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, संरपचा कविताताई दुधाळकर, डॉ अशोक कडाळे आदी
आदिवासी शेतकरी मेळाव्‍यात विद्यापीठ विकसित सोयाबीन बियाणे व कृषी दैनंदिनीचे वाटप करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, सोबत कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री रविंद्र पतंगे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, संरपचा कविताताई दुधाळकर, डॉ अशोक कडाळे आदी
आदिवासी शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री रविंद्र पतंगे, व्‍यासपीठावर कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, संरपचा कविताताई दुधाळकर, डॉ अशोक कडाळे आदी
..............................
आदिवासी शेतक-यांचा आर्थिकस्‍तर उंचावणे ही एक अविरत प्रक्रिया असुन विद्यापीठाने वाई हे आदिवासी गांव दत्‍तक घेऊन गेल्‍या दिड वर्षात आदिवासी उपयोजनेतंर्गत शेती उत्‍पादन वाढीसाठी अनेक कार्यक्रम घेतले, त्‍यास आदिवासी शेतक-यांनीही मोठया प्रतिसाद दिला. या पुढेही विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातुन आदिवासी शेतक-यांसाठी विद्यापीठ कार्य करील, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत सिंचन पाणी व्‍यवस्‍थापन संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने हिंगोली जिल्‍हयातील आदिवासीबहुल वाई या गावात आदिवासी उपयोजना राबविण्‍यात येत असुन या योजनेंतर्गत आदिवासी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दि १० जुन रोजी करण्‍यात आले होते, त्‍यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदचे सदस्‍य मा श्री रविंद्र पतंगे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, वाई गांवच्‍या संरपच कविताताई दुधाळकर, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ अशोक कडाळे उपस्थित होते.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, पुढील वर्षी वाई गावात विद्यापीठाच्‍या मार्गदर्शनाखाली ग्रामबिजोत्‍पादन घेण्‍यात येईल. तसेच विद्यापीठ शेतक-यांसाठी शेती पुरक जोडधंदाविषयी तांत्रिक माहिती पुरवील. आज पाणीचा प्रश्‍न अत्‍यंत गंभीर झाला असुन आदिवासी शेतक-यांनी देखिल आपल्‍या शिवारातील भुजल पातळी वाढण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत. विद्यापीठ वाई गावातील काही निवडक विहिर व बोरवेलचे पुनर्भरण प्रात्‍यक्षिक स्‍वरूपात करून देईल. प्रत्‍येक आदिवासी शेतक-यांनी माती परिक्षण करूनच पीक नियोजन करावे, यासाठी विद्यापीठाचे फिरते माती प्रयोगशाळेची सेवा देण्‍यात येईल, असे आश्‍वासन त्‍यांनी यावेळी दिले.
कार्यकारी परिषदचे सदस्‍य मा श्री रविंद्र पतंगे आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कुलगुरूच्‍या नेतृत्‍वखाली विद्यापीठाने नियोजनबध्‍द पध्‍दतीने आदिवासी उपयोजनेंतर्गत वाई या गांवी सुधारित कृषी तंत्रज्ञान पोहोचविले असुन त्‍यांचे निश्चितच चांगले परिणाम पहावयास मिळत आहेत. आदिवासी शेतक-यांत पीक उत्‍पादन वाढीसाठी स्‍पर्धात्‍मक वातावरण निर्मितीसाठीही विद्यापीठाने प्रयत्‍न करावेत, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.   
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आदिवासी उपयोजनेमुळे आदिवासी शेतक-यांशी विद्यापीठाची नाळ घट झाली असुन येणा-या खरिप हंगामात वाई गांवातील शेतक-यांना लागणारे तांत्रिक मार्गदर्शन करण्‍यात येईल.
विद्यापीठाचे तंत्रज्ञान वाई सारख्‍या दुर्गम आदिवासी भागात या योजनेमुळे पोहचले असुन आदिवासी शेतक-यांनी कमी खर्चाचे विद्यापीठाचे तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे मत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी यावेळी व्‍यक्‍त केले तर कुलसचिव डॉ दिनकर जाधव आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आदिवासी शेतक-यांनी विविध योजनेचा फायदा घेऊन स्‍वावलंबी व्‍हावे, मोफत शेती निविष्‍ठापेक्षा तंत्रज्ञान महत्‍वाचे असुन त्‍यांचा योग्‍य तो वापर करावा.
वाई गांवाचे आदिवासी शेतकरी हरिभाऊ दुधाळकर यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते मेळाव्‍यात वाई या गांवातील निवडक आदिवासी शेतक-यांना विद्यापीठ विकसित सोयाबीन बियाणे व कृषि दैनंदिनीचे वाटप करण्‍यात आले. मेळाव्‍यात सोयाबीन लागवड तंत्रज्ञानावर डॉ एस पी म्‍हेत्रे यांनी, तण व्‍यवस्‍थापनावर डॉ अशोक जाधव यांनी तर सोयाबीन पीकातील किड व्‍यवस्‍थापन यावर डॉ दयानंद मोरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ अशोक कडाळे यांनी आदिवासी उपयोजनेंतंर्गत राबविण्‍यात येत असलेल्‍या विद्यापीठाच्‍या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ गजानन गडदे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ यु एन कराड यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी एन के गिराम, देवेंद्र कुरा, दादाराव भरोसे, एकनाथ कदम, बी एस कांबळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास वाई गांवचे दोनशे आदिवासी शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.