Sunday, February 15, 2015

वनामकृवित ‘शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन’ यावर आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाच्‍या रेशीम संशोधन केंद्र व किडकशास्‍त्र विभाग यांच्‍या वतीने शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन यावर आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि १७ ते २४ फेब्रवारी दरम्‍यान करण्‍यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि १७ फेब्रवारी रोजी कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात होणार असुन इम्‍फाळ येथील केंद्रिय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एन. पुरी यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे राहणार असुन शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, रेशीम संचलनालयाचे संचालक डॉ सी जे हिवरे, म्‍हैसुर येथील केद्रिंय रेशीम संशोधन संस्‍थेचे माजी संचालक डॉ एस एम एच कादरी, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्‍याचा कृषि विभागातील व कृषि विज्ञान केंद्रातील कृषि विस्‍तारकांना शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षीत करणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुळ उद्देश आहे, असे प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्‍वयक डॉ सी बी लटपटे व सहसमन्‍वयक डॉ पी आर झंवर यांनी कळविले आहे.