Sunday, February 15, 2015

मौजे. बाभळगाव येथील वनामकृविच्‍या कीड व्‍यवस्‍थापनावरील शेतीदिनास उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्फे राष्‍ट्रीय कृषि विकास योजनांर्तगत मौजे बाभळगाव (ता.जि.परभणी) येथे  दि. ७ फेब्रुवारी रेाजी कीड व्‍यवस्‍थापनावर शेतीदिनाचे आयोजित करण्‍यात आले होते. या शेतीदिनामध्‍ये विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. आनंद गोरे, कीटकशास्‍त्रज्ञ डॉ. धिरज कदम, कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी डी.टी. सामाले यांची उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.
राष्‍ट्रीय कृषि विकास योजनांर्तगत मौजे बाभळगाव येथे हरभरा व रब्‍बी ज्‍वारीचे प्रात्‍यक्षीके घेण्‍यात आलेले असुन सदरिल प्रात्‍यक्षीकच्‍या प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्‍यात आले होते. हरभरा पीक हे घाटे भरण्‍याच्‍या अवस्‍थेत असुन या अवस्‍थेत शेतक-यांनी कीड व्‍यवस्‍थापनाबाबत डॉ. धिरज कदम मार्गदर्शन केले तर डॉ. आनंद गोरे यांनी रब्‍बी पीकातील पाणी व्‍यवस्‍थापन यावर माहिती सांगितली. तसेच डी.टी. सामाले यांनीही शेतक-यांना सध्‍याच्‍या दुष्‍काळ परिस्थिीतीत निराश न होता काम करावे व कृषि विभागाच्‍या योजनांचा लाभ घ्‍यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर जाधव यांनी केले व कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राहुल मांडवगडे, इंद्रजीत खटींग, दगडोबा पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सरपंच विठठल पारधे तसेच शेतकरी माऊली पारधे, उत्‍तम दळवे, कैलास उमाळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.