Monday, January 26, 2015

कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी साजरा केला मशरूमींग फिएस्‍टा (अळंबी महोत्‍सव)

अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमातंर्गत आळंबी (मशरूम) उत्‍पादन केंद्राच्‍या विद्यार्थ्‍यांचा उपक्रम

परभणी, २६: प्रजासत्‍ताक दिनाचे औजित्‍य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि वि़द्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमातंर्गत आळंबी (मशरूम) उत्‍पादन केंद्राच्‍या विद्यार्थ्‍यांनी ‍दिनांक २६ जानेवारी रोजी मशरूमींग फिएस्‍टा” (आंळबी महोत्‍सव) चे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते, व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, विभाग प्रमुख डॉ के टि आपेट यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षयीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, आळंबीमध्‍ये प्रथिनांचे प्रमाण जास्‍त असुन रोजच्‍या जेवणात प्रत्‍येक भाज्‍यांमध्‍ये याचा वापर केल्‍यास अन्‍नाची पोषकता वाढेल. विशेषत: मधुमेहाच्‍या रूग्‍णासाठी हा एक कमी उष्‍मांक असलेला चांगला पदार्थ असुन याबाबत समाजात प्रबोधन होणे गरजेचे आहे. महिला बचत गटांना आळंबीच्‍या उत्‍पादनात मोठी संधी असल्‍याचे प्रतिपादन त्‍यांनी केले. 
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, अन्‍नसुरक्षेचे उदिष्‍टे साध्‍य करण्‍यात आळंबीचा वापर करता येईल. आळंबी उत्‍पादनासाठी मराठवाडयात मोठा वाव असुन आळंबीचा वापर रोजच्‍या जेवणात वाढला पाहिजे. पदवी अभ्‍यासक्रमातील अनुभवाधारीत शिक्षणाचा विद्यार्थ्‍यांना जीवनात निश्चितच फायदा होईल, असे मत कुलसचिव डॉ डि एल जाधव यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.
प्रास्‍ताविकात कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी कृषि महाविद्यालयात राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रवींन्‍द्रकुमार राय यांनी केले तर आभार प्रदर्शन सारीका गुटटे हिने केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ के टि आपेट यांच्‍या मार्गदर्शनासाठी आंळबी उत्‍पादन केंद्राचे विद्यार्थीनी परिश्रम घेतले.
या मशरूमींग फेस्‍टात आळंबी उत्‍पादन केंद्रातील विद्यार्थ्‍यी निखील कुमार, मनिषा दहे, स्‍वेता जगताप, सुरेश कुलदिपके, गोविंद डोके, भागवत गवळी, धनंजय चतरकर व संतोष गडगिळे यांनी तयार केलेल्‍या आंळबीचे महत्‍व अधोरेखित करणारे भिंतीपत्रिकेचे वि‍मोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. प्रकृती मेशराम, आकांशा किर्ती, देशी योगिता, शिशीरा आरयन, माधुरी भोसले, मनिषा गव्‍हाणे, शैलेजा जोंधळे, केतकी नवगिरे, प्रिया शेळके, कांचन सोडगिर व दिपाली लंगोटे यांनी आंळबी आधारित रांगोळी रेखाटली होती. गोविंद डोंगरे, खलील शेख, हर्षल वाघमारे, अमोल वैद्य, बबन गायके, विजय लामदाडे, अश्विनी गोटमवाड, प्रदिप हजारे, कोमल शिंदे, प्रीती थोरात, सुशील बावळे, अशोक डंबाळे आदी विद्यार्थ्‍यांनी तयार केलेल्‍या आंळबीपासुन पौष्टिक असा मशरूम पुलाव व मशरूम भजी याचा स्‍वादही मान्‍यवरांनी घेतला.

मशरूम पुलाव व भजी
मशरूम आधारित भितीपत्रक 
मशरूम आधारित रांगोळी