Friday, September 12, 2014

रबी पीक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनानिमित्‍त दि १७ सप्‍टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात रबी पीक शेतकरी मेळावाचे आयोजन करण्‍यात आले असुन या मेळाव्‍याचे उद्घाटन भारतीय कृषि वैज्ञानिक निवड मंडळ, नवी दिल्‍लीचे माजी अध्‍यक्ष तथा माजी कुलगुरू मा. डॉ. चारूदत्‍त मायी यांच्‍या हस्‍ते होणार आहे. मेळाव्‍यास विशेष अतिथी म्‍हणुन महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट उपस्थित राहणार असनु अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु राहणार आहेत. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात रबी ज्‍वार, गहु, करडई, हरभरा लागवड तंत्रज्ञान, सद्यपरिस्थितीमध्‍ये कपाशी व सोयाबीन पीकांतील किड व रोग व्‍यवस्‍थापन, दर्जेदार डाळिंब व्‍यवस्‍थापन, ठिबक सिंचन, तण व्‍यवस्‍थापन आदी विषयावर विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तरी मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतकरी बंधु-भगिनींनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. साहेबराव दिवेकर व मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ राकेश आहिरे यांनी केले आहे.