Monday, August 4, 2014

वनामकृविचे शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) पदी डॉ अशोक ढवण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) पदी डॉ अशोक ढवण यांची नियुक्‍ती विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केली असुन दि १ ऑगस्‍ट रोजी निवृत्‍त शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे यांच्‍या कडुन पदभार स्‍वीकारला आहे. डॉ अशोक ढवण हे मृद विज्ञान व रसायनशास्‍त्र विभागाचे आचार्य पदवीधारक असुन त्‍यांना विद्यापीठाच्‍या कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण क्षेत्रातील विविध पदावर २९ वर्षाचा अनुभव आहे. विद्यापीठात त्‍यांनी सहायक प्राध्‍यापक, सहयोगी प्राध्‍यापक, प्राध्‍यापक, संशोधन उपसंचालक, विभाग प्रमुख तसेच लातुर व उस्‍मानाबाद कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य म्‍हणुन कार्य केले असुन गेली दोन वर्षापासुन विस्‍तार शिक्षण संचालक म्‍हणुन कार्यरत होते. विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी हा विद्यापीठाचा महत्‍वकांक्षी अभिनव विस्‍तार प्रकल्‍प त्‍यांच्‍याच मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात आला. त्‍यांची आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय पातळीवर अनेक शोध निबंधे, मराठी लेख व पुस्‍तके प्रसिध्‍द केलेले असुन त्‍यांची आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम प्रसारीत झालेली आहेत. त्‍यांचा नियुक्‍तीबद्ल विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी तसेच विविध स्‍तरातुन अधिकारी, कर्मचारी, शेतकरीवर्ग व विद्यार्थ्‍यानी अभिनंदन केले आहे.