Thursday, March 20, 2014

मातापित्‍याची सेवा हीच ईश्‍वर सेवा – प्रसिध्‍द ग्रामीण कथाकथनकार राजेंद्र गहाळ

रायपूर येथे वनामक़ृविच्‍या रासेयो विशेष शिबीरात प्रतिपादन 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीराचे आयोजन कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने रायपूर येथे  करण्‍यात आले असुन विशेष शिबीराचे उदघाटन कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ.बी.बी.भोसले यांच्‍या हस्‍ते दि. 18 मार्च रोजी झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन प्रसिध्‍द ग्रामीण कथाकथनकार व हास्‍यकवी राजेंद्र गहाळ हे उपस्थित होते तर कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. उदय खोडके, विदयार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख व पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
      राजेंद्र गहाळ म्‍हणाले की, मातापित्‍याची सेवा हीच ईश्‍वर सेवा असून त्‍यांची विद्यार्थ्‍यांनी जाणीव आयुष्‍यभर ठेवली पाहीजे, जीवनात यश प्राप्‍तीसाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याया नाही. अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले म्‍हणाले की, रासेयोच्‍या स्‍वयंसेवकांनी या शिबीरांत ग्रामीण जीवनाचा व समस्‍यांचा अभ्‍यास करावा, भविष्‍यात कृषि पदविधरांना ग्राम विकासात योगदान देतांना या अनुभवाचा निश्चितच फायदा होणार आहे. तसेच प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी उपस्थित ग्रामस्‍थांना शिक्षणाचे तर विदयार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांनी स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटवून दिले.
      विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे व स्‍वयंसेवक दिनेश भोसले यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा.रविंद्र शिंदे यांनी स्‍वयंसेवकांना राष्‍ट्रीय सेवा योजनेची शपथ दिली तर कार्यक्रम अधिकारी श्री. अनिस कांबळे यांनी रासेयोच्‍या विशेष शिबीराची रुपरेषा विशद केली. विशेष शिबीरासाठी विविध महाविदयालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. सोळंके, प्रा. व्हि.बी. जाधव व ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते. या सात दिवशीय विशेष शिबीरात व्‍यसनमुक्‍ती, अंधश्रध्‍दा निर्मुलन, रक्‍तदान शिबीर, ग्रामविकास, कृषि मेळावा, ग्रामीण स्‍वच्‍छता आदी विषयावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. 
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिता देशमूख व राजेंद्र पवार यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा.व्हि.बी. जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी दिनेश जगताप, शिवराज भांगे, सचिन नावकर, किरण दांगडे, योगेश निलवर्ण, देवकन्‍या स्‍वामी, स्‍वाती अमले, ज्‍योती खुपसे, मयुरी काळे, सागर झावरे, राजेश शिराळे यांच्‍यासह रासेयोच्‍या विविध महाविदयालयातील सर्व स्‍वयंसेवक व स्‍वयंसेवीका यांनी परिश्रम घेतले.