Sunday, January 19, 2014

कुंभकर्ण टाकळी ये‍थे कृषि निगडीत जोडउद्योग व्यवसायाबाबत मार्गदर्शन

कुंभकर्ण टाकळी ये‍थे युवक व युवतींसाठी कृषिशी निगडीत व्‍यवसायाबाबत मार्गदर्शन करतांना वरिष्‍ठ संशोधिका प्रा निता गायकवाड व व्यासपीठावर  ग्रामपंचायत सदस्‍य राजु देशमुख व ज्ञानेश्‍वर सामाले आदी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृ‍हविज्ञान महाविद्यालयाच्‍या मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास विभागातील अखिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍पातर्फे परभणी तालुक्‍यातील कुंभकर्ण टाकळी ये‍थे युवक व युवतींसाठी कृषिशी निगडीत व्‍यवसायाबाबत मार्गदर्शन आयोजीत करण्‍यात आले होते. याप्रसंगी प्रकल्‍पाच्‍या वरिष्‍ठ संशोधिका प्रा निता गायकवाड यांनी कृषि निगडीत जोडउद्योग व्‍यवसाय जसे की सोयाबीन प्रक्रिया उद्योग, दुग्‍ध व्‍यवसाय, कोरफड जेली व ज्‍युस व्‍यवसाय याबाबतची माहिती देऊन जास्‍तीत जास्‍त युवकांनी कृषि संलग्‍न जोडव्‍यवसायाकडे वळण्‍याची काळाची गरज असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्‍य राजु देशमुख व ज्ञानेश्‍वर सामाले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यापीठातर्फे प्रकाशित कृषि विषयक विविध घडीपत्रिकेचे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संशोधन सहयोगी रेश्‍मा शेख तर आभार प्रदर्शन रूपाली पतंगे यांनी केले. याप्रसंगी गावातील युवक व युवती मोठया संख्‍येने उपस्थित होते.