Wednesday, January 22, 2014

एलपीपी स्‍कुलच्‍या टॅलेन्‍ट शोमध्‍ये चिमुकल्‍यांनी दाखविली चुणूक


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास विभागाच्‍या एलपीपी स्‍कुलच्‍या वतीने दि 21 ते 23 जानेवारी दरम्‍यान टॅलेन्‍ट शोचे आयोजन करण्‍यात आले असुन दि 21 जानेवारी रोजी ब्रीज सेक्‍शन, ब्‍लू फलॉवर्स व ग्रीन फलॉवर्स सेक्‍शनच्‍या विद्यार्थ्‍यानी देशभक्‍तीपर समुह नृत्‍य, शेतकरी नृत्‍य, मुल्‍य संवर्धन, पर्यावरण संवर्धन अशा नाविण्‍यपुर्ण विषयांवरील नाटिका, लेझीम, फॅशन शो, समुह गाणी, भाषणे यासारख्‍या कलागुणांचे बहारदार सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा विशाला पटणम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्‍हणाल्‍या की, बालकांच्‍या सर्वांगीण विकासासाठी पालकांची भुमिका महत्‍वाची असुन त्‍यांची बालवयातच विशेष काळजी घ्‍यावी.  पर्यावरणावर पॉलीथीनच्‍या वापरामुळे मोठा दुष्‍परिणाम होत असुन त्‍यामुळे मानवाच्‍या आरोग्‍यावर ही मोठा परिणाम होत आहे, त्‍याच्‍या वापर न करण्‍याची शपथ सर्वाना याप्रसंगी त्‍यांनी घ्‍यायला लावली. कार्यक्रमात विद्यार्थ्‍याच्‍या वाढांक व बुध्‍दयांकाच्‍या आधारे जे विद्यार्थ्‍यी पात्र ठरले त्‍यांना व त्‍यांच्‍या पालकांना उत्‍कृष्‍ट पालक व उत्‍कृष्‍ट बालक पुरस्‍कारांने सन्‍मानित करण्‍यात आले. तसेच टॅलेन्‍ट शो मधील सहभागी विद्यार्थ्‍यांना उत्‍कृ‍ष्‍ट सादरिकरणाबददल प्रशस्‍तीपत्रे देण्‍यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वर्षा वाद्यमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ जया बंगाळे, प्रा रमन्‍ना देसेटटी व प्रा निता गायकवाड यांच्‍या नेतृत्‍वखाली सर्व शिक्षिका, कर्मचारी, मदतनीस, विभागातील पदवीपुर्व व पदव्‍युत्‍तर विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालक व विद्यार्थी वर्ग मोठया संख्‍येने उपस्थित होते.