Monday, July 1, 2013

हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची 100 वी जयंती साजरी

महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते मा. कै. वसंतरावजी नाईक यांच्‍या 100 व्‍या जयंती निमित्‍य मराठवाडा कृषि विद्यापीठात कृषिदिन साजरा करण्‍यात आला. यानिमित्‍य विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते कै. वसंतराव नाईक यांच्‍या पुतळयाचे पुजन करून आदरांजली वाहण्‍यात आली. या प्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे, कुलसचिव श्री. का. वि. पागीरे,  कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. ना. ध. पवार, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा. विशाला पटनम, उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य प्रा डॉ. गि. मा. वाघमारे, विभाग प्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे, डॉ. विलास पाटील, डॉ यु. एम. वाघमारे, डॉ. भ. वि. आसेवार, तसेच विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापकवृंद व कर्मचारी मोठया संख्‍येने उ‍पस्थित होते.