Thursday, March 21, 2013

रासेयोच्या स्वयंसेवकांनी ग्रामीण भागात जाऊन दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करावते ….मा डॉ किशनराव गोरे

पाणी व मातीचे संवर्धन करणे या दोन्‍ही गोष्‍टी एकमेकांना पुरक असुन पावसाचे पाणी आडवून जमीनीची होणारी धुप थांबिवणे अत्‍यंत आवश्‍यक आहे प्रतिपादन मराठवाडा कृषी विद्यापीठचे मा. कुलगुरू डॉ. के. पी. गोरे यांनी दि 20 मार्च 2013 रोजी राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या विशेष शिबिरामध्ये शेततळ्याचे अस्‍तरीकरण व भूजल संवर्धन या कार्यक्रमाच्‍या प्रसंगी राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या स्‍वयंसेवकांना उद्देशून केले. स्‍वयंसेवकांनी ग्रामीण भागात जावुन दुष्काळ निवारणासाठी प्रयत्‍न करावेत आणि विद्यापीठातील तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन त्‍यांनी केले. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. व्ही  एस शिंदे यांनी आपल्‍या मार्गदर्शनपर भाषणात स्‍वयंसेवकांनी कृषीदुत बनुन शेतक-यांना मदत करावी असा सल्‍ला दिला. शेततळ्याचे अस्‍तरीकरण विद्यापीठातील परीसरातील प्रात्‍यक्षीक प्रक्षेत्रावर प्राध्‍यापक भास्‍करराव भुईभार, प्रा. चौलवार व प्रक्षेत्र प्रभारी प्रा. नारखेडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध महाविद्यालयाच्या स्‍वयंसेवकांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सर्व महाविद्यालयचे कार्यक्रम अधिकारी  प्रा. ए. एम. कांबळे, प्रा. आर. व्‍ही. शिंदे, प्रा.बी .एस. आगरकर, प्रा. सोळंके, प्रा. िह. बी. जाधव व विविध महाविद्यालयाच्‍या स्‍वयंसेवकांनी परिश्रम घेतले तसेच दिनेश जगताप, ज्ञानेश्‍वर कदम, कैलास बेदरे, रमाकांत कारेगांवकर, पंकज खंदारे, राहु शेळके आदी विद्यार्थ्‍यांनी परीश्रम घेतले.