Thursday, January 3, 2013

मराठवाडा कृषी विद्यापीठात महिला शेतकरी मेळावा संपन्‍न

मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनालय व गृह विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दिनांक ३ जानेवारी २०१३ रोजी महिला शेतकरी मेळाव्याचे संपन्‍न झाला. या मेळाव्याचे उदघाटन महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा मा. श्रीमती रजनीताई सातव यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे होते. व्‍यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, अधिष्‍ठाता त‍था शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, जालन्याच्या महिला उद्योजिका सौ.संजीवनी जाधवपरभणीचे जिल्हा अधिक्षक  कृषी अधिकारी श्री. पी.  एच. मालेगावकर, हिंगोलीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. बी. एच. कच्छवे, श्रीमती भावनाताई नखाते, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. विशाला पट्टणम आणि माजी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ राजेश्वर कोटीखाने, विद्यापीठ अभियंता श्री. डी डी कोळेकर, नियंत्रक श्री.एन.जे.सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदघाटनपर भाषणात मा. श्रीमती रजनीताई सातव म्‍हणाल्‍या की, शेतकामात महिलांचा वाटा मोठा आहे, परंतु त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिला शिक्षित व स्वावलंबी झाल्या पाहिजेत तरच देशाची प्रगती होईल, देशातील साधारणत: ५०% लोकसंख्या हि महिलांची असून त्यांचा विकास झाला तर देश महासत्ता होईल. बचत गटाच्या माध्यमाने ग्रामीण महिला खऱ्या अर्थाने बोलक्या झाल्या, त्यामुळे महिलामध्ये उद्योजकता निर्माण झाली. ग्रामीण महिलानी बचत गट स्थापन करून त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. 
अध्‍यक्षीय भाषणात मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे म्‍हणाले की, शेतकामात महिलांचा वाटा मोठा असूनही निर्णय प्रक्रियात त्यांचा सहभाग कमी आहे. बचत गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण व ज्ञान घेऊन महिलांनी प्रक्रिया व शेती-जोड उद्योगात उतरावे. विद्यापीठाच्या कृषी शिक्षणात मुलींचा सहभाग वाढला आहे. यशस्वी उद्योजक महिलांपासून प्रेरणा व मार्गदर्शन घेऊन, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून प्रक्रिया उद्योग उभारावेत.  
महिला उद्योजिका सौ. संजीवनी जाधव यानी आवळा प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा सांगितली. त्या म्‍हणाल्‍या की, सावित्रीबाई फुले यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन निश्चित ध्येय ठरवुन काम करावे तर निश्चित यश प्राप्त होईल. बचत गटाच्या आधारे उद्योगास सुरवात करून यश संपादन केले. उच्च गुणवत्ता असलेल्या मालास मोठी बाजारपेठ आहे, यामुळे गुणवत्ता असलेल्या मालाची निर्मिती करावी.  
विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी महिला शेतकरी मेळाव्‍याचे महत्‍व मनोगतात विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृह विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. विशाला पटटनम यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. माधुरी कुलकर्णी तर आभार प्रदर्शन डॉ.विना भालेराव यांनी केले.
याप्रसंगी विभागप्रमुख डॉ.बी.एम.ठोंबरे यांनी संपादीत केलेल्या कृषी दिनदर्शिकाचे प्रकाशन तसेच शेतीभाती मासिकाचा महिला विशेषांक, विद्यापीठाच्या शास्त्रानानी तयार केलेल्या घडीपत्रीकांचे विमोचन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
तांत्रिक सत्रात डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी पशु-संवर्धन विकासात ग्रामीण महिलांचा सहभाग यावर मार्गदर्शन केले, माता व बालंकाचा आहार, आरोग्‍य व विकासाची मार्गदर्शीका यावर डॉ विजया नलावडे, वेळ व‍ पैश्‍याचे नियोजन यावर डॉ जयश्री रोडगे,  डॉ हेमांगिनी सरांबेकर तर सीताफळ प्रक्रिया उद्योगावर डॉ. डी.पी.वासकर, फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग या विषयावर डॉ. दिलीप मोरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आयोजीत कृषी प्रदर्शनाच्या विविध दालनास महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्याने भेटी दिल्या.मेळाव्यास मराठवाडयातील महिला शेतकरी, विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी मोठया संख्याने उपस्थित होते. 
महिला शेतकरी मेळाव्याचे उदघाटन करतांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा मा.श्रीमती रजनीताई सातव, मा.कुलगुरू डॉ.किशनराव गोरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण, अधिष्‍ठाता त‍था शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, महिला उद्योजिका सौ.संजीवनी जाधवगृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.विशाला पट्टणम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.बी.एच.कच्छवे आदि.   
महिला शेतकरी मेळाव्यात विभाग प्रमुख डॉ. बी एम ठोंबरे यांनी संपादित केलेल्या कृषी दिनदर्शिकेचे प्रकाशन करतांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा मा. श्रीमती रजनीताई सातव, मा.कुलगुरू डॉ.किशनराव गोरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण, अधिष्‍ठाता त‍था शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे,  महिला उद्योजिका सौ.संजीवनी जाधवगृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.विशाला पट्टणम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. पी.  एच. मालेगावकर, श्री.बी.एच.कच्छवे  आदि.

महिला शेतकरी मेळाव्यात शेतीभाती मासिकाच्या विशेषांकाचे विमोचन करतांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा मा. श्रीमती रजनीताई सातव, मा.कुलगुरू डॉ.किशनराव गोरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण, अधिष्‍ठाता त‍था शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे,  महिला उद्योजिका सौ.संजीवनी जाधवगृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.विशाला पट्टणम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. पी.  एच. मालेगावकर, श्री.बी.एच.कच्छवे प्रा पी एस चव्हाण आदि.
उपस्थित महिला 
महिला शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा मा.श्रीमती रजनीताई सातव

महिला शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना मा.कुलगुरू डॉ.किशनराव गोरे

महिला शेतकरी मेळाव्यात मनोगत व्यक्त करतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण

महिला शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना महिला उद्योजिका सौ.संजीवनी जाधव